Table of Contents
शेतकरी:
शेतकरी हा ई-पिक पाहणी प्रणालीचा प्राथमिक वापरकर्ता असेल. शेतकरी या प्रणाली द्वारे आपला मोबाईल नंबर नोंदविल व नोंदविलेल्या मोबाईल नंबर वर संकेतांक प्राप्त होईल. मिळालेला संकेतांक प्रविष्ट करून पिक पाहणी पूर्ण करेल.
ई -पीक पाहणी सहाय्यक स्तरावरील नोंदणी प्रक्रिया सहाय्यक / सर्वेक्षक:
- प्रत्येक गावासाठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मधून त्या गावातील व्यक्ती आपल्या नावाची नोंदणी करू शकेल.
- एका व्यक्तीची निवड त्या गावचे तलाठी हे त्यांचे वेब पोर्टलवरून मान्यता देऊन करतील.
- शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक हंगामामध्ये मदत करणे व जास्तीत जास्त पीक पाहणी शेतकऱ्यांकडून करून घेणे.
- शेतकऱ्यांकडून न झालेली पीक पाहणी स्वत: मोबाईल ॲप द्वारे पूर्ण करणे अशा प्रकारची कामे पार पाडेल.
सुपरवायझर / तलाठी:
शेतकऱ्यांनी केलेल्या पिक पाहणी पैकी १०% पडताळणी हि तलाठी यांचेमार्फत करण्यात येईल. तसेच सहाय्यक / सर्वेक्षक यांनी केलेल्या पिक पाहणी ची १००% पडताळणी तलाठी यांचेमार्फत करण्यात येईल.
व्हेरीफायर:
सत्यापनकर्ता हा शासकीय अधिकारी असेल व सुपरवायझर/तलाठी यांनी दोनदा नाकारलेल्या सर्व पीक पाहणीच्या नोंदी पडताळणी करून मोबाईल ॲप द्वारे नोंदी करेल.
सर्वेक्षक / सहाय्यक
- ॲप डाउनलोड करा
- मोबाईल ऍप्लिकेशनवर नोंदणी करा
- मोबाईल ऍप्लिकेशनवर लॉग इन करणे
- प्रोफाइल व्यवस्थापन
- प्रारंभ करणे
- मास्टर डेटा डाउनलोड आणि सिंक्रोनाइझेशन
- माय टास्क द्वारे नियुक्त कार्य सूची पाहणे
- डिजिटल पीक सर्वेक्षण सुरु करणे
ई-पीक पाहणी मोबाईल अॅप व्हर्जन-२ मधील पीक पेरा नोंदणीची प्रक्रिया
- सर्वेक्षक / सहाय्यक नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया :
स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी व्हर्जन-२ मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्थापित (install) करावा. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टॉल झाल्यावर प्रक्रिया. - खालील दिलेलेया लॉगीन पद्धत निवडा स्क्रीन मध्ये“सर्वेक्षक/सहाय्यक म्हणून लॉगीन करा” या बटन वर क्लिक करावे.
खालील दिलेल्या स्क्रीन प्रमाणे सांकेतांक मिळवण्यासाठी आपला चालू स्थितीत असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा.
वैयक्तिक तपशील भरा
- पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी तुमच्या ईमेल आयडीवर व मोबाईल क्रमांकावर सांकेतांक पाठवला जाईल.
- तुमचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक प्रमाणित झाल्यावर आधार क्रमांक प्रविष्ट करण्यासाठी खालील स्क्रीन दिसेल दिलेल्या चौकटीत आपला आधार क्रमांक लिहा.
- आधार क्रमांकाला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर सांकेतांक पाठवला जाईल. आधार लिंक मोबाईल वर आलेला संकेतांक भरा,
- लॉग इन करण्यासाठी पासवर्ड निवडा व पुष्टी करा.
- आपल्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव माहिती निवड
- लॉग इन करण्यासाठी पासवर्ड निवडा व पुष्टी करा.
आपल्या बँक खात्याचा तपशील नोंदवा
“सर्वेक्षक / सहाय्यक ” म्हणून मान्यता मिळाल्यावर आपला ईमेल व मोबाईल वर प्राप्त झालेला सांकेतांक प्रविष्ट करून लॉग करा.
“सर्वेक्षक / सहाय्यक ” म्हणून लॉगीन करा.
- सर्वेक्षण प्रलंबित मध्ये शेतकऱ्यांनी पीक पाहणी न केलेले गट व अंशतः पीक पाहणी नकेलेले गट यांची यादी दाखविली जाईल
- अंशतः पिक पाहणी झालेले खातेदार
- अपलोड प्रलंबित टॅब मध्ये सर्वेक्षण झाले परंतु नेटवर्क अभावी अपलोड न झालेल्या नोंदी ची यादी दिसेल. नेटवर्क मध्ये आल्या नंतर होम पेज वरील अपलोड बटण दाबून माहिती अपलोड करावी.
- अपलोड केले या टॅब मध्ये नेटवर्क असताना केलेली व अपलोड झालेली पीक पाहणी नोंदी ची यादी दिसेल.
- पुन्हा नियुक्त केले: खासगी सहय्यक / सर्वेक्षक यांनी केलेली पीक पाहणी सुपरवायझरने पहिल्या वेळेस नाकारल्यास सदर गट खासगी सहय्यक / सर्वेक्षक यांना पुन्हा पीक पाहणीसाठी उपलब्ध होईल.
सर्वेक्षण नाकारले
- पुन्हा नियुक्त केले: खासगी सहय्यक / सर्वेक्षक यांनी केलेली पीक पाहणी सुपरवायझरने पहिल्या वेळेस नाकारल्यास सदर गट खासगी सहय्यक / सर्वेक्षक यांना पुन्हा पीक पाहणीसाठी उपलब्ध होईल.
कायम पड / चालू पड जमीन नोंदणी –
खाते क्रमांक →गट क्रमांक→कायम पड / चालू पड प्रकार→ पड→ कायम पड / चालू पड जमीन क्षेत्र (हे.आर) → कायम पड फोटो घेऊन अपलोड करा.
बांधावरची झाडे नोंदवा –
तारीख→खाते क्रमांक→गट क्रमांक→बांधावरची झाडे→ झाडांची संख्या→फोटो घेऊन अपलोड करा.
माहितीची पुष्टी करा –
खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे .
पीक माहिती नोंदवा
पीक माहिती नोंदविण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. खाते क्रमांक→भूमापन→गट क्रमांक→जमिनीचे एकूण क्षेत्र (हे.आर)→ पोट खराब→हंगाम→पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र (हे.आर)→पिकाचा वर्ग→पिकांची / झाडांची नावे→क्षेत्र भरा (हे.आर)→जल सिंचनाचे साधने→सिंचन पद्धती→लागवडीचा दिनांक → पुढे जा
आपण निवडलेल्या गट क्रमांक / सर्वे क्रमांकाचा नकाशा व आपले गटापासूनचे अंतर दिसेल व जर आपण गट क्र. / सर्वे क्र.पासून लांब अंतरावर असाल तर अंतर हे लाल रंगाने दर्शविले जाईल.
आपण जर निवडलेल्या गट क्र./ सर्वे क्र..पासून लांब अंतरावर असाल तर खालील मेसेज दर्शिविला जाईल. अचूकता मिळवण्यासाठी “अद्यावत” बटण वर क्लिक करावे. लाल रंगाने दर्शविलेला अंतराचा चौकोन हिरवा झाल्यावर पिकाचा फोटो काढण्यासाठी “पुढे जा” बटण वर क्लिक करावे.
Buffer distance च्या आत आल्यावर आपणास पुढे जाऊ दिले जाईल
पिकाचा फोटो काढण्यासाठी “फोटो काढा” या बटण वर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा उघडेल. तसेच खाली दिलेल्या स्क्रीन प्रमाणे अक्षांश रेखांश व गट क्रमांक / सर्वे क्रमांकापासून तुम्ही उभे असलेले अंतर दर्शविले जाईल.
माहितीची पुष्टी करा: खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या पिकाच्या महितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे.